ST Bus Accident : बापरे! समोरासमोरच धडकल्या एसटी बस, गुहागर तालुक्यातील तीव्र वळणावर जोरदार धडक
गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. एसटी बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थोडक्यात बचावले गेल्यानं सगळ्यांच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
1 / 5
राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही एसटी बसच्या दर्शनी भागाचं जबरदस्त नुकसान झालं आहे. समोरासमोर झालेली धडक किती जबर होती, याचा अंदाज अपघाताच्या समोर आलेल्या फोटोवरुन करता येऊ शकेल.
2 / 5
गुहागर तालुक्यामधील अंजनवेल श्रृंगारतळी रस्त्यावर एसटी बसचा हा अपघात झाला. एका वळणावर हा अपघात घडला. सुदैवानं या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. एसटी बसच्या अपघातात दोन्ही बसच्या चालकांना मार बसरला. एसटीची समोरची काच तुटली आणि नुकसान झालंय.
3 / 5
एसटी बसच्या अपघातात दोन्ही एसटीचा चक्काचूर झाला होता. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांची एकच घाबरगु्ंडी उडाली होती. जीवितहानी जरी या अपघातामध्ये झाली नसली, तरी काही प्रवासी या अपघातामध्ये जखमी झालेत. त्यासोबत शालेय विद्यार्थ्यांनाही अपघातात मार बसलाय. पावसाखरी या गावातील एका वळणावर समोरुन येणाऱ्या एसटी बसचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही चालकांना गाडी नियंत्रित करता आली नाही आणि एसटी बस समोरासमोर धडकल्या.
4 / 5
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. एसटी बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थोडक्यात बचावले गेल्यानं सगळ्यांच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
5 / 5
राज्यात रस्ते अपघातांचं सत्र सुरुच आहेत. रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यात एसटीच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात एसटीचा पत्रा पूर्णपणे चेपला होता. दरम्यान, विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांच्या रस्ते अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील अपघातांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.