T20 World Cup : विराट-बुमराह नाही, हे दोन खेळाडू टीम इंडियाला जिंकवतील वर्ल्ड कप, रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

| Updated on: May 08, 2024 | 10:06 AM

T20 World Cup ची सुरुवात 2 जूनपासून वेस्ट इंडिज-अमेरिकेत होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध आहे. रोहित अँड कंपनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रबळ दावेदार आहे. पण प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला कोण चॅम्पियन बनवणार?. रवी शास्त्री यांनी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.

1 / 5
IPL नंतर T20 वर्ल्ड कपसारखी मोठी टुर्नामेंट सुरु होणार आहे. टुर्नामेंटची सुरुवात 2 जूनपासून होईल. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध आहे. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. विजयासाठी एक मजबूत टीम बनवण्यात आलीय.

2 / 5
T20 वर्ल्ड कपमध्ये कुठले खेळाडू सर्वोत्तम प्रदर्शन करतील, याचं उत्तर माजी कर्णधार आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी दिलं आहे. रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहवर इतका विश्वास दाखवलेला नाही. हुकूमाचे एक्के म्हणून त्यांनी दुसऱ्या दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.

3 / 5
रवी शास्त्री यांनी आयसीसीशी बोलताना यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे दोघे लेफ्टी फलंदाज असल्याच सांगितलं. दोघे बिनधास्त क्रिकेट खेळतात. जैस्वालने इंग्लंड विरुद्ध शानदार प्रदर्शन केलं होतं. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा त्याने शतक ठोकलय.

4 / 5
रवी शास्त्री यांनी यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे दोघांच नाव घेतलय. शास्त्री यांच्या मते मिडल ओव्हर्समध्ये शिवम दुबे धुमाकूळ घालेलं. चेन्नई सुपर किंग्ससाठी या सीजनमध्ये त्याने 170 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 350 धावा केल्या आहेत. स्पिनर्स विरुद्ध लांबलचक सिक्स मारण्याची दुबेची क्षमता एक्स फॅक्टर ठरेल.

5 / 5
शिवम दुबे स्पिनर्स विरुद्ध चांगली बॅटिंग करतो. त्यामुळे रिंकू सिंहच्या जागी त्याला प्राधान्य देण्यात आलय. त्याशिवाय दुबे मीडियम पेस गोलंदाजी करतो. T20 वर्ल्ड कपमध्ये टीमला जास्तीत जास्त ऑलराऊंडर्सची गरज आहे.