धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांनी एक काळ बाॅलिवूडमध्ये प्रचंड मोठा असा नक्कीच गाजवला आहे. मात्र, राजेश खन्ना यांच्या एका वाईट सवयीमुळे सर्वच लोक वैतागले होते. त्यावेळी राजेश खन्ना हे बाॅलिवूडचे सुपरस्टार होते.
1984 मधील चित्रपट धर्म और कानून चित्रपटामध्ये राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांनी सोबत काम केले. हा चित्रपट त्यावेळीच्या सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट होता. मात्र, या चित्रपटाच्या सेटवर राजेश खन्ना यांच्या वाईट सवयीमुळे सर्वच लोक हैराण झाले होते.
राजेश खन्ना हे सुपरस्टार होतेच मात्र, त्यांचे वागणे देखील तसेच होते. यामुळे सर्व लोक त्रस्त झाले होते. राजेश खन्ना हे कायमच चित्रपटाच्या सेटवर उशीरा येत असत. यामुळे सेटवरील सर्वच लोक त्यांना कंटाळले होते.
राजेश खन्ना यांच्या या सवयीचा प्रचंड राग हा धर्मेंद्र यांना आला होता. मग धर्मेंद्र यांनी राजेश खन्ना यांना धडा शिकवण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणेच राजेश खन्ना हे चित्रपटाच्या सेटवर उशीरा आले.
मग काय रागा रागत धर्मेंद्र हे राजेश खन्नाच्या मेकअप रूमकडे निघाले. मात्र, त्यावेळी कोणीतरी राजेश खन्ना यांना कल्पना दिली की, धर्मेंद्र तुम्हाला धडा शिकवण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. यानंतर मागच्या दरवाज्याने थेट राजेश खन्ना पळून गेले.