Marathi News Photo gallery Recurring deposit scheme interest rates four private banks offring more interest rate on rd check details here
RD : ‘या’ चार खासगी बँका आरडी खात्यावर देतायत सर्वाधिक व्याजदर, वाचा सविस्तर
RD ठेवीमधील तुमचा नफा बँकेने देऊ केलेल्या व्याज दरावर अवलंबून असतो. व्याजाचा दर जितका जास्त असेल तितका RD वरील नफा जास्त असेल. खासगी क्षेत्रातील चार बँका आहेत ज्या RD वर आकर्षक व्याज दर देतात.
1 / 5
छोट्या गुंतवणूकदारांसाठी रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. याद्वारे दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवून मोठा निधी जमा करता येतो. रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे बुडण्याची जोखीम कमी असते. अनेक छोटे गुंतवणूकदार त्याचा वापर भविष्यातील खर्च वाचवण्यासाठी करतात. रिकरिंग डिपॉझिट योजनेद्वारे गुंतवणूकदाराला दरमहा रक्कम जमा करता येते. आरडीवर ठेवीच्या कालावधीत चक्रवाढ व्याज मिळते. छोट्या आणि आर्थिक जोखीम न घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आरडी सर्वोत्तम पर्याय आहे. .
2 / 5
RD ठेवीमधील तुमचा नफा बँकेने देऊ केलेल्या व्याज दरावर अवलंबून असतो. व्याजाचा दर जितका जास्त असेल तितका RD वरील नफा जास्त असेल. खासगी क्षेत्रातील चार बँका आहेत ज्या RD वर आकर्षक व्याज दर देतात.
येस बँक- तुम्ही या खासगी क्षेत्रातील बँकेत 6 महिन्यांपासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी आवर्ती ठेव खाते उघडू शकता. येस बँक या कालावधीसाठी 5 ते 6.50 टक्के व्याज देत आहे. वरिष्ठ नागरिकांना आरडीवर 50 बीपीएस ते 75 बीपीएस अतिरिक्त व्याज दर मिळेल. हे 33 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी 50 बीपीएस अतिरिक्त व्याज देत आहे.
3 / 5
आयडीएफसी फर्स्ट बँक- ही खासगी क्षेत्रातील बँक एका गुंतवणूकदाराला किमान 100 रुपये मासिक ठेवीसह आरडी डिपॉझिट खाते उघडण्याची परवानगी देते. तुम्ही जास्तीत जास्त 75,000 रुपये मासिक जमा करू शकता. हे 6 महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंतच्या आरडीला 5 ते 6 टक्के व्याजदरांसह परवानगी देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बीपीएस मिळतील.
4 / 5
अॅक्सिस बँक- खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आपल्या खातेदारांना नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन रिकरिंग डिपॉझिट खाते उघडण्याचा पर्याय देते. आरडी खातेधारकांना 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी किमान 500 रुपये मासिक जमा करता येतात.
5 / 5
RBL बँक- या बँकेत 6 महिने ते 10 वर्षे कालावधीपर्यंत आरडी खातं काढता येतं. आरबीएल बँक या कालावधीसाठी 5.25 टक्के ते 6.75 टक्के व्याज दर देते. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बीपीएस व्याज दर देते आहे. एखादा आरबीएल खातेधारक आरडी डिपॉझिट खाते उघडू शकतो ज्यामध्ये दरमहा किमान 1000 रुपये जमा होतील. आरबीएल बँकेने 1 सप्टेंबर 2021 पासून आपल्या आरडी व्याज दरात सुधारणा केली आहे.