बाॅलिवूडमध्ये एक काळ अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीने गाजवला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी दहापेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यावेळी यांचे चित्रपट रिलीज होत होते, त्यावेळी यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरू लागल्या.
रिपोर्टनुसार दोघांचे अफेअर सुरू होते. अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा आणि त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. मात्र, बऱ्याच वेळा रेखा यांनी कधी स्पष्टपणे तर कधी इशाऱ्यामध्ये नक्कीच भाष्य केले आहे.
एका जुन्या मुलाखतीमध्ये रेखा यांनी म्हटले होते की, मी अमिताभ बच्चनवर खूप जास्त प्रेम करते. त्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नक्कीच नाहीये. पण मी एक अभिनेता म्हणून त्यांच्यावर प्रेम करते.
ज्याकाही अफेअरच्या चर्चा आहेत, त्यासर्व चुकीच्या आहेत. आमच्यामध्ये कोणतेच पर्सनल रिलेशन नाहीये. यावेळी रेखा हिने थेट म्हटले होते की, पागलासारखे प्रेम मी अमिताभ बच्चनवर करते.
रेखाने पुढे म्हटले होते की, आमचे कोणतेही रिलेशन हे पर्सनल नाही आणि हे खरे आहे, असे काही घडलेच नाही. बाकी काहीच गोष्टींमध्ये सत्य अजिबातच नाहीये.