अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता रेखा कोणच्या सिनेमामुळे नाही तर, नव्या लूकमुळे चर्चेत आल्या आहेत.
वयाच्या 70 व्या वर्षी रेखा कायमम दमदार फोटोशूटमुळे चर्चेत असतात. आता देखील रेखा यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
बोल्ड ड्रेसमध्ये हटके पोज देत रेखा यांनी रेर्टो लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. रेखा यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
रेखा यांचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.
रेखा यांच्या फोटोंवर फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र रेखा यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.