अभिनेत्री रेखा यांनी वयाच्या 70 व्या वर्षी नवं फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या 'अनारकली' ड्रेसमध्ये नववधूपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे. त्यांनी दागिन्यांसह हेवी मेक-अपही केला आहे. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
रेखा यांचे फोटो शेअर करताना फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी लिहिलं, 'मॅजेस्टिक, तेजस्वी आणि जबरदस्त रेखा जी. प्रत्येक फ्रेम तिची अतुलनीय आभा प्रतिबिंबित करते.'
रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. 'रेखा यांचं वय वाढत नाही तर, कमी होतंय...', अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'रेखा म्हणजे एव्हरग्रीन सौंदर्य...'
रेखा यांचे फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.
रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे.