प्री वेडींगनंतर प्रथमच आजीसोबत धीरुभाईंच्या गावी पोहचले अनंत अंबानी, अन् जे सांगितले त्यानंतर…
anant ambani rich chorwad: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे कपल प्री वेडींग कार्यक्रमानंतर धीरुभाई अंबानी यांच्या जन्मगावी पोहचले. यावेळी त्यांची आजी कोकीळाबेन सोबत होते. गावात जाऊन अनंत अंबानी यांनी गावकऱ्यांची मने जिंकली.
1 / 5
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींगची चर्चा मागील आठवड्यात राहिली. या प्री वेडींग समारंभाला जगभरातील दिग्गज आले होते. या कार्यक्रमाची देशातील नाही तर विदेशातील माध्यमांनीही त्याची दखल घेतली.
2 / 5
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग समारंभानंतर ते धीरुभाई अंबानी यांच्या जन्मगाव असलेल्या चोरवाड येथे पोहचले. यावेळी आजी कोकिळाबेन सोबत होती. यावेळी तिघांनी गावातील भवानी माताजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
3 / 5
अंबानी परिवाराने अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडींग कार्यक्रमानंतर चोरवाडमध्ये सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यापूर्वी गावात "डायरा" कार्यक्रम ठेवला होता. हा गुजराती पारंपारीक संगीत कार्यक्रम आहे. त्यात लोकगीत सादर केले जातात.
4 / 5
कार्यक्रमात अनंत अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजोबांच्या गावातून त्यांच्यासारखे दहा धीरुभाई तयार झाली पाहिजे, हीच माझी महत्वकांक्षा आहे. पुढील दहा वर्षांत दहा धीरुभाई गावातून तयार झाले पाहिजे. ही शक्ती या गावात आहे, असे अनंत यांनी म्हणताच जोरदार टाळ्यांची गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
5 / 5
अनंत अंबानी म्हणाले, मी आणि राधिका तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आपण सर्वांनी आम्हाला आमच्या पूर्ण परिवारास आशीर्वाद द्यावे. या गावामुळेच रिलायन्स आहे. रिलायन्समध्ये सर्वकाही या गावामुळे आले आहे.