anant ambani | उद्योगपती अनंत अंबानी अचानक पोहचले खंडाळा शहरात, पाहा photo
anant ambani | सध्या नवरात्र उत्सवाचे वातावरण सर्वत्र आहे. देवींची शक्तीपीठ आणि धार्मिक ठिकाणी गर्दी होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस जागर होत आहे. दांडिया, गरबा ठिकठिकाणी रंगले आहेत. त्याचवेळी रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी अचानक खंडाळा शहरात आले.
1 / 5
मुंबई पुणे प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावळाकडे जाताना निसर्गाचा आनंद मिळत असतो. ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या खंडाळा घाटमाथ्यावर श्री वाघजाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
2 / 5
पूर्वी खंडाळ्याच्या घनदाट अरण्यातून प्रवास करणे म्हणजे धाडसी होते. यामुळे या ठिकाणांवरुन जाणारे व्यापारी, सैनिक आणि नागरिक आई वाघजईला साकडे घालून दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास करत होते. अनंत अंबानी यांनी खंडाळा येथे जाऊन वाघजाई देवीचे दर्शन घेतले.
3 / 5
खंडाळा येथील प्रसिद्ध वाघजाई देवीच्या मंदिरात सोमवारी संध्याकाळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आले. मंदिर संस्थानला यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना नव्हती. अचानक अनंत अंबानी आल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले.
4 / 5
खंडाळ्यात अचानकपणे अनंत अंबानी आल्यामुळे ग्रामस्थ चकित झाले. यावेळी अनंत अंबानी यांनी खंडाळा ग्रामस्थांबरोबर फोटो काढले. यामुळे ग्रामस्थांना आनंद झाला. अनंत अंबानी मंदिरात आल्याची चर्चा गावात पसरली.
5 / 5
लोणावळा येथे अंबानी यांचे फार्म हाऊस आहे. त्याठिकाणी अनंत अंबानी आले होते. त्यावेळी त्यांनी खंडाळा येथील वाघजाई देवीचे दर्शन घेतले. त्यांनी पूजाही केली. अनंत अंबानी यांनी वाघजाई देवीला काय साकडे घातले, हे मात्र कळाले नाही.