महाराष्ट्रात कुठे, कुठे आहेत उलटे धबधबे, पाहा राज्यातील प्रसिद्ध उलटे धबधबे
reverse waterfall : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. श्रावण महिनाही सुरु होणार आहे. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. पर्यटक डोंगर, दऱ्या अन् धबधबे पाहण्यासाठी बाहेर पडत आहे. नाणेघाटातील अद्भुत निसर्गाची अनुभूती आहे.
1 / 5
नेहमी आपण धबधबे वरुन खाली पडत असल्याचे पाहतो. परंतु नाणेघाटात उलटा धबधबा आहे. हा धबधबा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतो. या धबधब्याला उलटा धबधबा म्हणतात. नाणे घाटातील धबधब्याचं पाणीही खाली पडते, परंतु हवेचा मोठा दाब असल्यामुळे ते पुन्हा वर येते. नाणेघाट हा धबधबा पुण्यात जुन्नरजवळ आहे.
2 / 5
महाराष्ट्रात सावंतवाडी तालुक्याचीस अंबोली गावातील ‘कावळेसाद’ हा धबधबा उलटा आहे. आंबोलीपासून ८ किलोमीटरवर हा धबधबा आहे. या ठिकाणी नेहमी धुके असते.
3 / 5
पाटण तालुक्यातील तारळे येथेही सडावाघापुरात उलटा धबधबा आहे. या उलट्या धबधब्यास पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
4 / 5
नाशिकमध्ये उलटा धबधबा आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाताना अंजनेरी पर्वत लागतो. या ठिकाणी उलटा धबधबा पावसाळ्यात पाहण्यास मिळतो. या गडावर हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे म्हटले जाते.
5 / 5
उलटा धबधबासाठी गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू आहे. परंतु या ठिकाणी वारा खूप वेगाने वाहतो. यामुळे वाऱ्याचे बल गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा जास्त असते. त्यामुळे धबधब्याचे पाणी वर उडते.