सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी क्लीन चिट मिळताच रिया चक्रवर्ती पोहोचली ‘या’ मंदिरात

| Updated on: Mar 25, 2025 | 12:13 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआयकडून ही क्लीन चिट मिळताच रिया तिच्या कुटुंबीयांसोबत मुंबईतील एका प्रसिद्ध मंदिरात देवाच्या दर्शनासाठी पोहोचली.

1 / 5
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन्ही प्रकरणांचा तपास बंद करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. याबाबत न्यायालयात तपास बंद करण्याची शिफारस सीबीआयकडून करण्यात आली आहे. या निर्णयानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे.

2 / 5
सुशांतच्या वडिलांनी 2020 मध्ये बिहारमधील पाटणा इथं अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणं, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप करत तक्रार केली होती.

3 / 5
सुशांतच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या आरोपांबाबत कोणतेही पुरावे सीबीआयला सापडले नसल्यामुळे याबाबत ही शिफारस करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सीबीआयने या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबालाही क्लीन चिट दिली आहे.

4 / 5
क्लीन चिट मिळाल्यानंतर रिया चक्रवर्ती तिच्या वडील आणि भावासोबत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी पापाराझींसमोर तिघांनी फोटोसाठी पोझ दिले.

5 / 5
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाल्यानंतर तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “मला अभिमान आहे की मी एका सैनिकाच्या कुटुंबाचा बचाव केला. मी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला सलाम करतो. रियाला खूप त्रासांना तोंड द्यावं लागलं.”