Marathi News Photo gallery Rishi Sunak: Who is Rishi Sunak of Indian origin in the race for British Prime Minister; Learn from Foro Story
Rishi Sunak: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील भारतीय वंशाचे ऋषी सुनक कोण आहेत ; घ्या जाणून
ऋषी सुनक हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. अक्षता मूर्ती ही नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अक्षता मूर्ती ही सुनकची पत्नी आहे.
1 / 5
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीत सर्वाधिक ८८ मतांनी आघाडी घेतली, त्यानंतर त्यांची चर्चा अधिक रंगू लागली आहे. त्यामुळे आठ उमेदवारांऐवजी सहा उमेदवार या शर्यतीत उरले आहेत.
2 / 5
ऋषी सुनक यांच्याबद्दल सांगायचे तर, ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सुनकचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण ब्रिटनमधील खाजगी शाळा विंचेस्टर कॉलेजमधून केले, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले.येथून त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले.
सुनकने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्समधून आपल्या करिअरला सुरुवात केली.
3 / 5
ऋषी सुनक यांच्याबद्दल सांगायचे तर ते 2015 मध्ये पहिल्यांदा रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार झाले. तेव्हापासून ते तिथे सातत्याने प्रतिनिधित्व करत राहिले.गेल्या वर्षी, सुनक हे रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते.
4 / 5
ऋषी सुनक हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. अक्षता मूर्ती ही नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अक्षता मूर्ती ही सुनकची पत्नी आहे.
5 / 5
अर्थमंत्री होण्यापूर्वी त्यांना 2018 मध्ये ब्रिटनच्या गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. सुनक यांची ऑक्टोबर 2014 मध्ये रिचमंड (यॉर्क) साठी कंझर्व्हेटिव्ह उमेदवार म्हणून निवड झाली, त्यांनी पक्षाचे माजी नेते आणि परराष्ट्र सचिव विल्यम हेग यांची जागा घेतली.