हॅपी बर्थडे पापा..; रितेश-जिनिलिया यांच्याकडून विलासराव देशमुख यांना अभिवादन

| Updated on: May 26, 2024 | 1:29 PM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशमुख कुटुंब हे बाभळगाव इथल्या विलासबागेत उपस्थित होतं. विलासराव यांच्या स्मृतींना त्यांनी विनम्र अभिवादन केलं. अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
अभिनेता रितेश देशमुखचे दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज 79 वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंबीय हे बाभळगाव इथल्या विलासबागेत उपस्थित राहिले.

2 / 5
रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांसोबत उपस्थित राहून त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केलं.

3 / 5
रितेशचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख यांनीसुद्धा सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. धीरज यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख, अमित देशमुख आणि इतरसुद्धा या फोटोंमध्ये दिसत आहेत.

4 / 5
या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते', असं एकाने लिहिलं. तर 'रितेश सर, तुम्हाला अधिक बळ मिळो', असं दुसऱ्याने म्हटलंय.

5 / 5
विलासराव देशमुख यांचं 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झालं. रितेश अनेकदा त्याच्या वडिलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. काही दिवसांपूर्वी जेव्हा विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता, तेव्हा वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेशच्या डोळ्यांत अश्रू होते.