Marathi News Photo gallery Riteish Deshmukh and Genelia Deshmukh wedding album from sath phere to bidai watch these special moments
सप्तपदी ते पाठवणीचा तो भावूक क्षण.. रितेश-जिनिलियाच्या लग्नाचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री जिनिलिया डिसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी 2012 मध्ये लग्न केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा सर्वांत चर्चेत असलेला लग्नसोहळा होता. या लग्नाला बरेच सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. रितेशच्या फॅनपेजवर या लग्नाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
1 / 8
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांना एकत्र पाहिलं की, जोडी असावी तर अशी.. हेच वाक्य अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. रितेशच्या एका फॅनपेजवर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
2 / 8
रितेश आणि जिनिलियाच्या लग्नसोहळ्यातील हे खास क्षण तुम्ही क्वचितच पाहिले असतील. लग्नात जिनिलियाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर रितेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.
3 / 8
जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.
4 / 8
जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येच तिने मुख्य भूमिका साकारली.
5 / 8
कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने याआधीच्या एका मुलाखतीतही स्पष्ट केलं होतं. रितेशने तिला लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्यापासून रोखल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं.
6 / 8
“लोक त्यांना जे म्हणायचं असतं ते म्हणतात पण त्यात काही तथ्य नसतं. मी स्वत:हून इंडस्ट्रीपासून दूर गेले, कारण मला माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा होता. रितेश आणि मुलांसोबत मला वेळ घालवायचं होतं," असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
7 / 8
रितेश-जिनिलियाच्या लग्नसोहळ्यातील हा एक खास क्षण.. अभिनेता अक्षय कुमार या लग्नाला आवर्जून उपस्थित होता. रितेश आणि जिनिलियाची भेट घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे.
8 / 8
लग्नानंतर मुलीची पाठवणी करतानाचा क्षण हा प्रत्येक आईवडिलांसाठी अत्यंत भावूक क्षण असतो. पाठवणीदरम्यान जिनिलियाचेही डोळे पाणावले होते. कारमध्ये बसल्यानंतर अत्यंत भावूक होऊन आपल्या कुटुंबीयांकडे बघताना जिनिलिया..