Team india
विराट कोहलीसाठी हा सामना खास होता. कारण तो आपल्या टेस्ट करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळत होता.
भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे यात विराट कोहलीला सन्मानित करत असल्याचेही फोटो आहेत.
विराट आणि रोहित मध्ये सुप्त स्पर्धा असून त्यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या नेहमी मीडियामध्ये येत असतात. त्यामुळे रोहितने विराटचे फोटो पोस्ट करण्याचं एक वेगळ महत्त्व आहे.
पहिल्याकसोटीआधी हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटला स्पेशल कॅप भेट देऊन सन्मानित केलं.
रोहित शर्माच्या या पोस्टनंतर फॅन्सही भावूक झाले आहेत. रोहितने विराटला गार्ड ऑफ ऑनरही दिला.
रोहित शर्माने विराटसाठी 100 वा कसोटी सामना विशेष बनवणार असल्याचं म्हटलं होतं. मैदानावरही त्याने तसंच केलं.
रोहित शर्माला पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करता आली नाही. पण कसोटीमध्येही कर्णधार म्हणून त्याने विजयी सुरुवात केली आहे.
रोहित शर्माने कर्णधारपदाची जबाबदारी संभाळल्यापासून भारतीय संघ सातत्याने यशाची कमान चढतोय.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धची टी 20 मालिका जिंकून भारताने विजयी हॅट्रिक पूर्ण केली.