पुराणात रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली असे म्हटलं गेलं आहे. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणून ते रुद्राक्ष असे संदर्भ पुराणात मिळतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यां व्यक्तीवर शिवाची विशेष कृपा असते अशी मान्यता आहे. पण ते परिधान करण्यासाठी काही नियम आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.
रुद्राक्ष काळ्या धाग्यात कधीही परिधान करु नये. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
रुद्राक्ष भगवान शिवाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला स्पर्श करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतरच घालावे. यासोबतच रुद्राक्ष धारण करताना मनात ओम नमः शिवाय मंत्राचा जप अवश्य करावा. या गोष्टीमुळे रुद्राक्षाचा प्रभाव वाढतो.
दुसर्याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा स्वतःचा रुद्राक्ष दुसर्याला घालू नका. यामुळे तुम्हाला भगवान शंकराच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. त्याच प्रमाणे ही माळा बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान २७ मणी असावेत.
धाग्याव्यतिरिक्त, तुम्ही रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करू शकता. पण जर तुम्ही माळा बनवत असाल तर लक्षात ठेवा की रुद्राक्ष विषम संख्येत असावा. आयुर्वेदानुसार रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा रोगांशी लढते, त्यामुळे आपले आरोग्य सुधारते.