Russia Ukraine War : युक्रेनमधून नागरिकांचे पलायन; मन हेलावून सोडणारी दृष्यं

| Updated on: Mar 09, 2022 | 12:25 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली आहे, तर अनेकांना युद्धामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. अनेक जण युद्धाच्या भीतीने सुरक्षीत निवारा शोधत आहेत. तर काही जणांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. आता या सर्व परिस्थितीचे भीषण आणि मन हेलावून सोडणारे फोटो समोर येत आहे.

1 / 5
 रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. बॉम्ब हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन प्रशासनाने नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या छायाचित्रामध्ये अशीच एक मुलगी हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी बंकरमध्ये लपली आहे.

2 / 5
या छायाचित्रामध्ये एक 76 वर्षीय महिला दिसत आहे. स्वेतलाना असे तीचे नाव आहे. ती युक्रेनच्या ओडेसामधील रहिवासी असून, युद्धाच्या भीतीपोटी तीने आपले शहर सोडले असून ती पोलंडच्या सीमेवर दाखल झाली आहे.

3 / 5
युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्यहानी झाली आहे, रशियाच्या हल्ल्यामध्ये अनेक युक्रेनीयन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका युक्रेनियन नागरिकाचा मृतदेह प्लस्टिकच्या रॅपरमध्ये पॅक केलेला आपण या छायाचित्रामध्ये पाहू शकता. हे छायाचित्र  7 मार्च, 2022 रोजी युक्रेनमधील मारियुपोल शहरात घेण्यात आले आहे.

4 / 5
 रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून नागरिक बाहेर पडत आहेत. अशाच एका महिलेला तिचे नागरिक सुरक्षीत स्थळी हलवताना दिसत आहे. ही महिला व्हीलचेअरवर बसलेली आहे. मात्र प्रचंड बर्फवृष्टीमुळे स्थलांतरणाला देखील अडथळे निर्माण होत आहेत.

5 / 5
युक्रेनमधून आतापर्यंत जवळपास बारा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतर केलेले युक्रेनियन नागरिक युक्रेनमधून पलायन करून, पोलंडच्या प्रझेमिसल रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत.