Marathi News Photo gallery Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial story after seven years here is what happens titeeksha tawde aishwarya narkar
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये मोठा ट्विस्ट; सात वर्षांनंतरच्या कथानकात काय होणार बदल?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक सात वर्षांनी पुढे जाणार आहे. सात वर्षांनंतर मालिकेत कोणकोणते बदल होणार आहेत, हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल. या मालिकेच्या कथानकाविषयीचे अपडेट्स जाणून घेऊयात..
1 / 7
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. शतग्रीवच्या वार करण्याने इंद्राणी कोमात जाते आणि शतग्रीव रीमाऐवजी ईशाला म्हणजेच जे दैवी बाळ आहे त्याला घेऊन जातो.
2 / 7
त्याच्या तावडीतून नेत्रा ईशाला देवीआईच्या मदतीने सोडवते. शतग्रीवला मैथिलीचं शरीर सोडावं लागलं आणि नेत्राला तिची मुलगी ईशा परत मिळाली. त्याचवेळी त्रिनयना देवीने मैथिलीला आधार देण्यासाठी नेत्राला आदेश दिला. देवीने सांगितल्याप्रमाणे नेत्रा मैथिलीला पुन्हा घरात घेऊन येते.
3 / 7
राजाध्यक्ष कुटुंब काही केल्या मैथिलीला स्वीकारण्यात कोणतंच स्वारस्य दाखवत नाहीत हे समजून नेत्राने त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच मैथिलीला आपलंस करणार नाही हे लक्षात येतं. नेत्राची खटपट पाहून शेवटी मैथिली नेत्राचा विचार करून घर सोडते.
4 / 7
तेव्हाच पुरलेल्या बंटीमामाच्या कानात शतग्रीव प्रवेश करत मैथिलीची भेट घेतो. मैथिली मात्र तिथपासून दूर पळते आणि राजाध्यक्ष कुटुंबात परतते. त्यावेळी एक आकाशवाणी होते की शतग्रीव पुन्हा येणार. ही सृष्टी उद्ध्वस्त करणार आणि मालिकेचं कथानक सात वर्षे पुढे जातं.
5 / 7
सात वर्षांनंतर ईशा-रीमा मोठ्या झाल्या आहेत. पण राजाध्यक्ष कुटुंबात नेत्राला वाटणारं सुख हे खरंतर वरवरचा देखावा असून घर दुभंगलं जातं. नेत्रा मैथिलीचं सगळं करण्यात आणि मुलींच्या संगोपनात गर्क होते.
6 / 7
राजाध्यक्ष कुटुंबातले सदस्य नेत्राच्या विचारांशी सहमत नसल्याने विरुद्ध होतात. अशातच कोमात असलेली इंद्राणी, जी मरणाच्या दारात आहे, तिला ईशाच्या स्पर्शाने पुन्हा जीवनदान मिळतं आणि एक नवा अध्याय सुरु होतो.
7 / 7
मालिकेत नेत्राच्या आईपणाचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात नेत्रा तिच्या कुटुंबाला एकत्र कशी बांधून ठेवेल आणि खऱ्या अर्थी राजध्यक्ष कुटुंबात सुख नांदेल का, या प्रश्नांच्या आधारावर आता मालिकेचं सात वर्षांनंतरचं कथानक असेल.