“मी स्वतःला ‘महागुरू’ समजतच नाही”, ट्रोलर्सला सचिन पिळगावकरांनी दिले उत्तर

| Updated on: Apr 08, 2025 | 2:05 PM

सचिन पिळगावकर हे महागुरु म्हणून ओळखले जातात. पण त्यांना अनेकदा ट्रोल देखील केले जाते. आता या ट्रोलर्सला सचिन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीसोबत बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात.  त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ९०चे दशक तर त्यांनी चांगलेच गाजवले आहे. आता त्यांनी एका कार्यक्रमामध्ये ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

2 / 5
सचिन पिळगावकर हे 'एका पेक्षा एक' डान्स रिॲलिटी शोमध्ये मुख्य परीक्षक असल्यानं त्यांना 'महागुरू' नावानं संबोधलं जायचं. पण पुढे अख्खी इंडस्ट्रीच त्यांना याच नावाने ओळखू लागली.

3 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी 'महागुरू' या उपाधीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. "महागुरू या नावाला तुम्ही पदवी म्हणा किंवा मग आणखी काही, ते मी स्वतः लावून घेतलेले नाव नाही. ते मला झी वाहिनीने दिले आहे" असे ते म्हणाले.

4 / 5
पुढे ते म्हणाले, "मी स्वत:ला कधीही महागुरु मानले नाही. मी स्वत:ला केवळ एक कुटुंबप्रमुख मानतो. कार्यक्रमात त्या मुलांचे गुरु सुद्धा असणार होते, जे त्यांना डान्स शिकवणार होते. ते गुरू होते. मी त्यांच्या वर होतो म्हणून मला महागुरु हे नाव दिले. पण, मी कधीही स्वत:ला महागुरु मानले नाही. मी स्वत:चा उल्लेख करताना केवळ कुटुंब प्रमुख म्हणून करतो."

5 / 5
या मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी काम मिळत नसल्यामुळे खंत देखील व्यक्त केली आहे. त्यांनी कोणही अभिनेता म्हणून आमच्याकडे या असे विचारत नसल्याचे देखील सांगितले आहे.