घरातच काचेचा पूल, सुंदर गार्डन, जगभरातील खास झाडे; सचिन तेंडुलकरचा 6000 स्क्वेअर फूटचा आलिशान बंगला आतून असा दिसतो

| Updated on: Nov 18, 2024 | 6:47 PM

सचिन तेंडुलकरचा मुंबईतील आलिशान बंगला हा आतूनही तेवढाच आकर्षक आहे.. 6000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यातील सर्वच गोष्टी अतिशय युनिक आहेत.

1 / 10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटर म्हणून जसा सर्वांचा आवडता आहे तसेच तो माणूस म्हणूनही सर्वांचा आवडता आहे. सचिन यांनी त्यांचे वैभव हे फार कष्टाने उभारलेलं आहे. आणि आजही त्यांना याची जाणीव आहे.

2 / 10
 जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणून नक्कीच सचिनचे नाव येतं.  त्याची एकूण संपत्ती काही हजार कोटींच्या घरात आहे. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो.

3 / 10
 सचिनचा बंगला अतिशय सुंदर असून तो बाहेरून कसा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण बंगला आतूनही तेवढाच युनिक आणि वेगळ्या ढंगात डिझाईन केलेला आहे. तर, पाहुयात की नक्की सचिनचा बंगला आतून कसा दिसतो ते.

4 / 10
सचिनचे घर 6000 स्क्वेअर फूटचं असून ते खूपच आलिशान आहे. सचिनच्या घराला अनेक मजले असून याला दोन बेसमेंट सुद्धा आहेत. शिवाय घरातच सुंदर गार्डन असून त्यात जगभरातील अनेक सुंदर आणि खास झाड लावण्यात आली आहेत.

5 / 10
बंगल्याच्या टेरेसवर सुंदर गार्डन तयार करण्यात आले असून याठिकाणी एक काचेचा पूल देखील आहे . शिवाय इथे एक जिम सुद्धा तयार करून घेण्यात आली आहे.

6 / 10
हा बंगला 1926 मध्ये बनवण्यात आला असून या बंगल्याचे नाव 'दोराब विला' असं आहे. सचिनने हा बंगला 2007 मध्ये खरेदी केला आणि 2011 मध्ये तो कुटुंबासोबत इथे रहायला आला होता.

7 / 10
सचिनच्या बांद्रा येथील घरातून समुद्र दिसतो. बंगल्याशिवाय सचिन तेंडुलकरकडे एक अपार्टमेंट सुद्धा असून ज्याच्यामध्ये  स्विमिंग पूल आणि जिम सुद्धा आहे.

8 / 10
सचिन तेंडुलकरचं कुटुंब हे धार्मिक असल्याने त्याच्या बंगल्यात एक मोठं देवघर सुद्धा आहे.

9 / 10
सचिनच्या मुंबईतील बंगल्याचे आतले फोटो पाहून त्याच्या घरात फर्निचर पासून ते इंटेरिअरपर्यंत सर्व काही खास आहे असं म्हटलं जातं.

10 / 10
सचिन तेंडुलकरच्या बंगल्यातील बेसमेंटमध्ये कार पार्किंग आणि गॅरेज असून त्याच्याकडे इत्यादी आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सचिनचं हे कार कलेक्शन कोट्यवधींच्या घरात आहे.