महागडे केशर आरोग्यासाठीही आहे उत्तम! जाणून घ्या फायदे

| Updated on: Oct 08, 2023 | 11:08 PM

केशर गरम असते, ते अनेकदा दुधात मिसळून प्यायले जाते. याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. केशर ही एक अतिशय महागडी वस्तू आहे ज्याची किंमत आपल्याला ती विकत घेण्यापासून रोखते, परंतु निसर्गाचा तो खजिना आहे जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

1 / 5
केशर खूप महाग असतं असं आपण ऐकत आलेलो असतो. पण केशरचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी हे उत्तम आहे. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर केशर हा उत्तम उपाय आहे. केशरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रेटिनाचे संरक्षण करण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याचबरोबर मोतीबिंदूसारख्या आजारांपासून केशर संरक्षण करते.

2 / 5
तुम्ही अल्झायमर बद्दल ऐकलंय का? या आजारात व्यक्तीला विसरायची सवय लागते. हा आजार टाळण्यासाठी केशर खा असं सांगितलं जातं. उत्तम स्मरणशक्ती हवी असेल तर केशर बेस्ट!

3 / 5
केशर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. सर्दी, खोकला, सर्दी, फ्लू आणि ताप यासारख्या सामान्य विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास केशर मदत करते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक केशर मध्ये असतात.

4 / 5
मधुमेह रुग्णांसाठी केशराचे सेवन उत्तम असल्याचं जगातील अनेक संशोधनात सिद्ध झालेलं आहे. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. केशरमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते.

5 / 5
शरीरातील सेरोटोनिनमुळे आपला मूड चांगला होतो. केशर या सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरचे नियमन करण्यास मदत करते. शरीरात हे सुरळीत असलं की मूड चांगला राहतो. केशर खाऊन नैराश्य दूर होऊ शकते.