Marathi News Photo gallery Saif ali khan ex wife amrita singh gave him sleeping pills during shooting of hum saath saath hain here is why
‘हम साथ साथ है’च्या शूटिंगदरम्यान अमृताने सैफला दिल्या झोपेच्या गोळ्या; दिग्दर्शकांनी सांगितला किस्सा
राजश्री प्रॉडक्शन्सचे नामांकित दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. 'हम साथ साथ है' या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान सैफ सतत रिटेक्स घेत होता. अखेर सूरज यांनी सैफची पूर्व पत्नी अमृताला फोन केला होता.
1 / 5
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम साथ साथ है' हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे, मोहनिश बहल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. एका जुन्या मुलाखतीत दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सैफ अली खानचा एक किस्सा सांगितला.
2 / 5
'सुनोजी दुल्हन' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सैफला अनेक रिटेक्स घ्यावे लागले होते. सैफचं अभिनय सहज असल्याने एका टेकमध्ये शूटिंग पूर्ण व्हावं, अशी दिग्दर्शकांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सैफची पत्नी अमृता सिंगला फोन केला. तेव्हा अमृताने त्यांना सांगितलं की, "भूमिका परफेक्ट करण्यासाठी, डायलॉग्स लक्षात ठेवण्यासाठी सैफ रात्रभर जागाच असतो."
3 / 5
हे ऐकल्यानंतर सूरज यांनी अमृताला एक सल्ला दिला. सैफला झोप येईल यासाठी त्याला काही औषधं देऊन बघ, असं ते तिला म्हणाले होते. "माझं ऐकून तिने एकेदिवशी हळूच त्याला औषध दिलं आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सेटवर आला, तेव्हा एका टेकमध्ये पूर्ण गाणं शूट झालं. तेव्हा सैफलाही आश्चर्य वाटलं होतं", असं सूरज यांनी सांगितलं.
4 / 5
"वन टेक शूटिंग कसं झालं, असा प्रश्न सैफने मला विचारला. त्यावर मी म्हणालो, तुझा अभिनय अत्यंत सहज आहे. झोप पूर्ण झाली तर अभिनयसुद्धा नीट होतं. त्यावेळी सैफ सतत खूप तणावात असायचा. कारण 'दिल चाहता है'च्या आधी त्याचे चित्रपट फारसे चालले नव्हते", असं ते पुढे म्हणाले.
5 / 5
याविषयी त्यांनी सांगितलं, "सैफ खूप तणावात असायाचा. पहिल्यांदा इतकी मोठी भूमिका आणि तेसुद्धा इतक्या मोठ्या कलाकारांसोबत.. त्यामुळे त्याच्यावर खूप दबाव होता. म्हणूनच तो मेहनत खूप करायचा. सतत डायलॉग्स पाठ करायचा."