अभिनेत्री रिंकू राजगुरू 'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात तिने आर्चीची भूमिका साकारली होती. रिंकू इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून चाहत्यांसोबत ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतंच तिने 'आस्क मी एनिथिंग' या सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी नेटकऱ्यांनी तिला तिच्या खासगी आयुष्याविषयीही प्रश्न विचारले. रिंकूनेही या प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली.
एका युजरने रिंकूला विचारलं, 'तुझं टोपणनाव काय आहे?' त्यावर उत्तर देताना रिंकूने लिहिलं 'प्रेरणा'. रिंकूचं खरं नाव प्रेरणा हेच आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवरील तिचं हे नाव खूप व्हायरल झालं होतं.
आणखी एका युजरने रिंकूला थेट तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं. 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे', असा प्रश्न विचारणाऱ्याला रिंकूने उत्तर दिलं, 'बॉयफ्रेंड नाहीये, त्यामुळे नाव पण नाहीये.'
इन्स्टाग्रामवर रिंकूचे नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे विविध फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.