पती अब्जाधीश, पण नवऱ्याकडून एक रुपयाही घेत नाही ही प्रसिद्ध अभिनेत्री!
एक अशी अभिनेत्री आहे, जी नेहमी चर्चेत असते. तिचा नवरा अब्जाधीश उद्योगपती आहे. पण तिने आजवर नवऱ्याकडून कधी एक रुपयाही घेतला नाही. अभिनेत्रीने नुकताच त्याबाबतचा खुलासा केला होता.
1 / 8
बॉलिवूडपासून ते हॉलिवूडन आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे कलाकार नेहमीच लग्न, अफेयर आणि नेटवर्थ यामुळे चर्चेत राहतात. एक अशी अभिनेत्री आहे, जी नेहमी चर्चेत असते. तिचा नवरा अब्जाधीश उद्योगपती आहे. पण तिने आजवर नवऱ्याकडून कधी एक रुपयाही घेतला नाही. अभिनेत्रीने नुकताच त्याबाबतचा खुलासा केला होता.
2 / 8
हॉलिवूडमधल्या अभिनेत्रीचा हा किस्सा आहे. 58 वर्षाची सलमा हायेक हीच ती अभिनेत्री. सलमाचा नवरा अब्जाधीश आहे. पण स्वत: कमाई करण्यावर तिचा भर असतो. ती कधीच कुणावर निर्भर राहिली नाही. लक्झरी ग्रुप केअरिंगचे सीईओ फ्रांकोइस- हेन्री पिनॉल्ट तिचा नवरा आहे. पण तिने नवऱ्याकडून कधी एक पैही घेतली नाही.
3 / 8
सलमा हायेक ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री आहे. तिला बाणेदारपणं उभं राहायला आवडतं. प्रत्येक संकटावर मात करायला आवडतं. विशेष म्हणजे दबावाखाली राहून पैसा कमावणं ही तिची खासियत आहे. आयुष्याची पर्वा न करता बिनधास्त जगणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. इन्स्टावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.
4 / 8
एका मॅगेझिनशी बोलताना तिने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तिला कोणत्या गोष्टी प्रेरित करतात? असं सलमा हायेकला विचारण्यात आलं. त्यावर कमाईच्या प्रेशरमध्ये मी यशस्वी होते असं तिचं म्हणणं आहे.
5 / 8
58 वर्षीय सलमा अजूनही कार्यरत आहे. प्रचंड मेहनत ही तिची ओळख झाली आहे. माझ्यावर कमाईचा दबाव असणं मला आवडतं. आता मी अधिक कमाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ती म्हणते. तिला आपल्या अब्जाधीश नवऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. तिला स्वातंत्र्य प्रिय आहे. त्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत असते.
6 / 8
सलमाला तिच्या नवऱ्याची काम करण्याची पद्धत खूप आवडते. मला वाटतं ते अट्रॅक्टिव्ह आहे. एक दुसऱ्यांचा मान राखणं हा आमच्या लग्नाचा एक भाग आहे, असं ती म्हणते.
7 / 8
सलमा आणि फ्रेंकोइस यांना एक 17 वर्षाची मुलगीही आहे. सलमाला अभिनयासोबतच एक पोटेन्शिअल बिझनेस प्लानही करायचा आहे. या प्लानमध्ये मुलीची साथ मिळावी अशी तिची इच्छा आहे.
8 / 8
सलमाची Entrepreneurship भावना काही नवीन नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून ती त्यासाठी काम करत आहे. मेक्सिकोतील एका श्रीमंत कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिच्या वडिलांचा ऑईलचा बिझनेस होता. पण जेव्हा ती 20 वर्षाची झाली तेव्हा आर्थिक स्थिती बदलली आणि तिला तिचा मार्ग बदलावा लागला. तिने प्रत्येक आव्हान स्वीकारलं. तिने लॉस एंजेलिसला जाऊन तिचं करिअर बनवलं. या अनुभवातूनच खूप काही शिकायला मिळाल्याचं ती म्हणते.