स्टाइल स्टेटमेंट मध्ये असते सगळ्यात पुढे, पहा Samantha Ruth Prabhu चा बॉसी लुक
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभूचे खूप चाहते आहेत. तिचे चाहते तिला तिच्या फॅशन सेन्स साठी, तिच्या स्टाइल साठी देखी फॉलो करतात. तिच्या वेगवेगळ्या लुक्सवर तिचे चाहते घायाळ होतात. या अभिनेत्रीला तिच्या कपड्यांसोबत एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. चला बघुयात तिचे सगळ्यात भारी असणारे लुक्स
1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. तिचा फॅशन सेन्स बघण्यासारखा असतो. अनेकजण तिला तिच्या फॅशनसाठी फॉलो करतात. समंथाला तिच्या कपड्यांमध्ये एक्सपेरिमेंट करायला आवडतं.
2 / 5
या फोटोमध्ये समंथाने निळ्या रंगाच्या डेनिमसोबत काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. यावर तिने काळ्या रंगाचं जॅकेटसुद्धा परिधान केलंय. यासोबतच तिने काळ्या रंगाचा गॉगल लावलाय. ती या बॉसी लूकमध्ये खूप डॅशिंग दिसतेय. निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा टॉप हा एक चांगला लूक आहे.
3 / 5
काळ्या रंगाची साडी आणि तिला सोनेरी रंगाची काठ. बाह्या नसलेला ब्लाऊज आणि बोल्ड मेकअप. यात तिने गुलाबी, केशरी रंगाचे दागिने परिधान केलेत. हा ब्लाऊज इतका फॅशनेबल आहे की त्यामुळेच या साडीला जास्त चांगला लूक आलाय.
4 / 5
आर्मी ग्रीन रिब्ड टॉप मध्ये समंथा खूप भारी दिसतीये. तिने या टॉपवर त्यालाच मॅचिंग कार्गो घातलीये. यात तिने कमीत कमी फॅशन केलीये पण तरीही खूप आकर्षक दिसतेय.
5 / 5
को ऑर्ड सेट हा एक नवीन ड्रेसचा प्रकार सध्या मार्केट मध्ये आलाय. मुलींमध्ये याची खूप क्रेझ आहे. या को ऑर्ड सेट मध्ये वेगवेगळे प्रिंट्स उपलब्ध असतात. हा को ऑर्ड सेट ब्लॅक अँड व्हाईट ब्रॉड स्ट्रिप्सचा आहे. या ड्रेसवर समंथाने एक स्टायलिश गॉगल चढवलाय.