मान्यता देखील पती संजय दत्त याच्याप्रमाणेच सिनेमांमध्ये काम करत होती. २००३ साली मान्यता हिने 'गंगाजल' सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं. मान्यता हिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. पण 'देशद्रोही' सिनेमानंतर तिला मान्यता म्हणून ओळख मिळाली.
२००८ साली मान्यता आणि संयज यांनी गोव्यात लग्न केलं. पण मान्यता हिने पहिल्या पतीला घटस्फोट न देता संजूबाबा सोबत लग्न केलं अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. रिपोर्टनुसार, मान्यता हिने २००३ मध्ये मेराज रहमान शेख याच्यासोबत लग्न केलं होतं.
मेराज याने मान्यता हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. अखेर कोर्टाने मेराज आणि मान्यता यांचा घटस्फोट झाला आहे असं ठरवत मान्यता हिला दिलासा दिला.
मेराज याच्याबद्दल मान्यता म्हणाली, 'त्याला लोकप्रियता हवी आहे म्हणून तो असं करत आहे. तो तुरुंगात आहे. कारण त्याच्यावर अनेक महिलांना अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप आहेत...'
संजूबाबा याच्यासोबत लग्नच्या चार वर्षांपूर्वी मेराज याला मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत घटस्फोट दिल्याचं देखील मान्यता हिने कोर्टाला सांगितलं होतं. आता संजय दत्त आणि मान्यता दत्त एकमेकांसोबत आनंदी आहेत. त्यांना जुळी मुलं देखील आहेत.