बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त हा एकेकाळी त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वादामुळे चर्चेत असायचा. त्यावेळी संजय दत्त हा जास्त करून नशेमध्ये राहत असे. मात्र, एकदा तो थेट नशा करून सेटवर पोहचला.
संजय दत्त हा नशेमध्येच थेट विधाता चित्रपटाच्या सेटवर पोहचला आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी हिच्यासोबत चुकीचे वागत होता. यामुळे पद्मिनी कोल्हापुरी घाबरली.
इतकेच नाही तर पद्मिनी कोल्हापुरी सेटवरून निघून जात होती. नशेमध्ये आपण काय करत आहोत हे देखील संजय दत्त याला अजिबात कळत नव्हते.
सुभाष घई यांनी संजय दत्तला नशेमध्ये बघितले आणि रागामध्ये थेट त्याच्या कानाखाली जाळ काढला. सुभाष घई यांनी पद्मिनी कोल्हापुरी हिला देखील समजून सांगितले.
सुभाष घई याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये संजय दत्त याने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, बऱ्याच वेळा चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त नशेमध्येच पोहचायचा.