Sanjay Dutt : इंडस्ट्रीत येऊ नको असा संजय दत्तने ऐश्वर्या रायला सल्ला का दिलेला?

| Updated on: Dec 10, 2024 | 4:37 PM

Sanjay Dutt : ब्युटी क्वीन ऐश्वर्या रायचा बॉलिवूडच्या टॉप एक्ट्रेसमध्ये समावेश होतो. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ती यशस्वी मॉडल होती. ती मिस वर्ल्ड सुद्धा होती. चित्रपट सृष्टीत आल्यानंतर ऐश्वर्या रायच सलमान खानसोबत प्रेम प्रकरण गाजलं. त्यानंतर ती अभिषेक सोबत लग्न करुन बच्चन कुटुंबाची सून बनली

1 / 5
ऐश्वर्या रायची संजय दत्त बरोबर पहिली भेट एका मॅगजीनच्या फोटोशूट दरम्यान झाली. त्यावेळी ती अभिनेत्री नव्हती. पण ऐश्वर्या रायला पाहून संजय दत्त तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नव्हता.

2 / 5
एका जुन्या इंटरव्यूमध्ये संजय दत्त ऐश्वर्यासोबत आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलला होता. ऐश्वर्याला पाहून संजय दत्त बोललेला की, ही सुंदर मुलगी कोण आहे?

3 / 5
संजय दत्तने त्यावेळी ऐश्वर्या रायला सल्ला दिलेला. तिने आपलं मॉडलिंगच करिअर पुढे न्यावं. फिल्म इंडस्ट्रीपासून लांब रहावं. रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, निष्पापभावांनी संजय दत्तच मन जिंकलं होतं. त्याने ऐश्वर्याला रायला सांगितलेलं की, तू चित्रपट सृष्टीपासून लांब रहा. कारण हे क्षेत्र तुला बदलून टाकेल.

4 / 5
इंडस्ट्रीमध्ये जे चॅलेंजेस आहेत, त्याचा सामना करताना तुझं आकर्षण, जादू कमी होईल असं संजय दत्तने तिला सांगितलेलं.

5 / 5
"तुम्ही जेव्हा या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत पाऊल ठेवता, तेव्हा ही इंडस्ट्री तुम्हाला बदलून टाकते. तुम्हाला परिपक्व बनवते, तुमचा निष्पापपणा हरवतो" असं संजय दत्तने तेव्हा म्हटलेलं. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा निष्पापपणा हरवेल, कारण तिला चित्रपट सृष्टीला हँडल करावं लागेल" असं संजय दत्तच मत होतं.