शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.
10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते.
ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय