'झी मराठी' वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत निकीता ही नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करतेय.
मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंटकडून खरे रिपोर्ट्स मागवते.
दुसरीकडे श्रीनु आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरु असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते.
ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येतं.
आता चारू कोणता नवीन डाव खेळेल? ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का? श्रीनुसमोर चारूचं सत्य आल्यावर तो काय करणार, या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.