‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; होणार रहस्यमयी खुलासा
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत पंचपिटिका रहस्याची तिसरी पेटी सापडली आहे. या पेटीत एक पान आहे आणि त्या पानावर सर्पलिपीत काहीतरी लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ काय आणि ही पेटी नेमकी कोणाची आहे, हे प्रेक्षकांना पुढील एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीचं रहस्य सर्वांसमोर उलगडलं आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून कोणतं रहस्य बाहेर येणार हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2 / 5
तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य या आठवड्यात समोर येईल. जेव्हा तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेलं रहस्य समोर येईल, तेव्हा पंचपिटिका रहस्य एक रोमांचक वळण घेईल. कारण ते रहस्य सर्पलिपीमध्ये आहे.
3 / 5
या पेटीमध्ये विरोचक कोण आहे याचंही रहस्य उलगडू शकतं. इंद्राणी नेत्राचं रक्षण कसं करणार, जेव्हा रुपाली समोर विरोचकाचं नाव येईल तेव्हा काय होईल, पानावरच्या रहस्यामध्ये असं काय लिहिलं आहे जे वाचून नेत्रा आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, हे सर्व पुढील एपिसोडमध्ये पहायला मिळेल.
4 / 5
तिसऱ्या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का, पेटीमधल्या मजकुरावर लिहिलेली सर्पलिपी वाचायला त्यांची मदत कोण करणार या प्रश्नांचीही उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.
5 / 5
पहिल्या दोन पेट्या इंद्राणी आणि नेत्राच्या हाती लागल्या आहेत, हे पाहून रुपालीचं रक्त खवळतं आणि ती मनात गाठ बांधते की तिसरी पेटी ती त्यांच्या हाती लागू देणार नाही. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.