अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री किआरा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.
अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रती सनॉन स्टारर 'आदिपूरुष' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या कधी ओटीटीवर प्रदर्शित होणार हे देखील लवकरच समोर येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमा देखील लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्रीचा पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. ११ ऑगस्ट रोजी हार्ट ऑफ स्टोन सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
क्राईम थ्रिलरवर आधारलेला 'पोर थोजिल' हा तामिळ सिनेमा ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात सरथकुमार, अशोक सेलवन आणि निखिला विमल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
'धूमम' एक मल्याळम अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन पवन कुमार यांनी केले आहे. २३ जून २०२३ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झालेला सिनेमा ४ ऑगस्ट रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.