PHOTO: स्टेट बँकेने श्रीनगरमध्ये उभारलं तरंगणारं ATM
SBI Bank ATM | स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरे यांच्या हस्ते या तरंगत्या ATM चे उद्घाटन करण्यात आले. हे ATM स्थानिकांची रोख रक्कमेची गरज पूर्ण करेल, अशी माहिती एसबीआयने ट्विटवरुन दिली.
-
-
भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरच्या स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी तलावात तरंगणारे ATM सुरु केले आहे.
-
-
जगप्रसिद्ध दाल सरोवरात नौकांच्या आधारे हे ATM उभारण्यात आले आहे. या ATM मुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी प्रत्येकवेळी बँकेत जावे लागणार नाही.
-
-
स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरे यांच्या हस्ते या तरंगत्या ATM चे उद्घाटन करण्यात आले. हे ATM स्थानिकांची रोख रक्कमेची गरज पूर्ण करेल, अशी माहिती एसबीआयने ट्विटवरुन दिली.
-
-
SBI ATM transaction Limit : स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या नियमांनुसार तुम्ही एका दिवसात ATM मधून कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता. ग्लोबल इंटरनॅशनल कार्डमधून 40 हजार आणि गोल्ड इंटरनॅशनल कार्डमधून 50 हजार रुपये काढता येतात.
-
-
यापूर्वी एसबीआय बँकेने 2004 मध्ये केरळमध्ये फ्लोटिंग एटीएम उभारले होते. झंकार या नौकेवर हे ATM उभारण्यात आले होते.