‘WITT’च्या मंचावर वेगळ्या अंदाजात दिसले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाहा खास फोटो
नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या कार्यक्रमात पोहचले. यावेळी नरेंद्र मोदी हे काही वेगळ्याच अंदाजामध्ये दिसले. हेच नाही तर यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना देखील नरेंद्र मोदी हे दिसले. आता व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमधील काही फोटो व्हायरल होत आहेत.
1 / 8
TV9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल समिटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहचले. यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना नरेंद्र मोदी दिसले. हेच नाही तर यावेळी काही वेगळ्याच अंदाजामध्ये मोदी दिसले.
2 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 10 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढला आहे. म्युच्युअल फंडात 52 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. यावर्षात मोठी डिजिटल क्रांती झाली.
3 / 8
कोरोनाच्या काळात सरकारवरील विश्वास लोकांचा वाढला. 2014 मध्ये लोकांनी म्युच्युअल फंडांमध्ये 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, तर 2024 मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये 52 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
4 / 8
काँग्रेसवर जोरदार टीका करताना नरेंद्र मोदी हे दिसले. मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी अनेक वर्षे सरकार चालवले, त्यांना भारतीयांवरच विश्वास नव्हता. थेट लाल किल्ल्यावरूनच भारतीयांना आळशी आणि कमी लेखले गेले.
5 / 8
पंतप्रधान म्हणाले, 2014 पासून सरकारने खेडेगाव डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. गावे आणि शहरे यांच्यातील संपर्क सुधारला असून रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण केल्या आहेत.
6 / 8
मोदी म्हणाले, या अगोदरच्या सरकारची आणखी एक विचारसरणी म्हणजे त्यांना देशातील लोकांना गरिबीत ठेवणे आवडते. फक्त निवडणूकीच्या वेळी गरीब लोकांना थोडेफार देऊन आपला स्वार्थ पूर्ण करत असत.
7 / 8
अभूतपूर्व पद्धतीने भारताचे काम सुरू आहे. 10 वर्षात 17 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेतल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेली कामे आमच्या सरकारने पूर्ण केल्याचे मोदींनी म्हटले.
8 / 8
गेल्या 10 वर्षांत लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. हेच नाही तर परकीय गुंतवणूकीमध्येही मोठी वाढ झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.