Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी
अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणांचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात यावे या अनुशंगाने विविध बियाणे कंपन्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बियाणे कंपन्यांनी बिजोत्पादन करुन दाखवले आहे. या कार्यक्रमात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कडधान्यापासून काढलेल्या रांगोळ्या हा आकर्षणाचा विषय ठरला होता. अथक परीश्रम घेऊन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तर या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बियाणांची तर माहिती झालीच पण पेरणी दरम्यान काय काळजी घ्यावयाची याची देखील माहिती मिळाली आहे.
1 / 5
बियाणे महोत्सव : शेती व्यवसायात अधिकच्या उत्पादनासाठी सर्वात आवश्यक आहे ते चांगल्या प्रतीचे बियाणे. खरीप हंगामापूर्वी याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावी या उद्देशाने एकत्र येत वेगवेगळ्या बियाणे कंपन्यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
2 / 5
कडधान्यापासून रांगोळी : बियाणे महोत्सवात श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी विविध कडधान्याच्या माध्यमातून काढलेल्या तीन रांगोळ्या आकर्षनाचा विषय ठरत आहे..रांगोळ्या काढण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा तासांचा अवधी लागला असून या रांगोळ्या मध्ये गहू,तूर,हरबरा,तांदुळ, मुंग,उडीड,ज्वारी आदी कडधान्य वापरून ही आकर्षण रांगोळ्या साकारल्या आहे.
3 / 5
शेतकऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन : बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीचे बारकावे सांगितले. बिजोत्पादन, बियाणांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरणही झाले. जिल्हाभरातून शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते.
4 / 5
म्हणून महोत्सावाचे आयोजन : विविध बियाने कंपन्यांनी बियाणे प्रक्रिया करून तयार केले आहेत. श्री शिवाजी महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बियाणे महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात विविध कंपन्यांनी आपले बियाणे शेतकऱ्यांच्या माहीती साठी ठेवले होते. तर शेतकऱ्यांनी बियाणे महोत्सवाला भेट देऊन बिजोत्पादनाची प्रक्रिया जाणुन घेतली.
5 / 5
कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम : अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात हा एक दिवसीय महोत्सव पार पडला. या निमित्ताने कृषी महाविद्यालयातही शेतीसाठी नेमके कोणते काम केले जाते याची अनुभती शेतकऱ्यांना घेता आली. महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींची लगबग सुरु होती.