Pooja Dadlani House: आलिशान महालासारखं आहे शाहरुख खानच्या मॅनेजरचं घर; पाहा फोटो
पूजा ददलानी गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान याच्या सोबत काम करत आहे. पूजा शाहरुख याच्या ब्रँड एंडोर्समेंट पासून ते क्रिकेट टीमपर्यंत सर्व कामांची जबाबदारी घेते. पूजाच्या मानधनाबाबत सांगायचं झालं तर, पूजाच्या कमाईचा आकडा फार मोठा आहे.
1 / 5
Pooja Dadlani House : अभिनेता शाहरुख खान आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) अभिनेत्याच्या कुटुंबाचा भाग नसली तरी, अभिनेता कायम तिच्यासोबत असतो. किंग खान यांची पत्नी देखील अनेकदा दोघांसोबत असते. एवढंच नाही तर, महत्त्वाच्या क्षणी आणि सणांना देखील पूजा शाहरुख आणि त्याच्या कुटुंबासोबत असते. पूजा, गौरी आणि शाहरुख यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. गौरी एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर आहे. गौरी हिने अभिनेत्याची मॅनेजर पूजाच्या नव्या घराचं इंटेरिअर केलं आहे. सध्या सर्वत्र पूजाच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत . खुद्द पूजा हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलं आहेत.
2 / 5
पूजा हिने घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. फोटोंमध्ये पूजाचं घर भव्य आणि प्रचंड सुंदर दिसत आहे. अनेक महागड्या वस्तूंनी गौरी हिने पूजाचं घर सजवलं आहे. सध्या सर्वत्र पूजाच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. पूजाच्या भव्य घराचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल.
3 / 5
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये पूजा आणि गौरी एका काऊचवर बसलेले दिसत आहेत. फोटो पोस्ट करत पूजाने कॅप्शनमध्ये, 'माझ्या नवीन घरात पहिलं पाऊल...' गौरीने माझ्या घराला घरपण दिलं आहे...
4 / 5
पूजाच्या घराबद्दल सांगायचं झालं तर, तिचं घर प्रचंड भव्य आहे. घरातील लिव्हिंग रुप आकर्षक आहे. सोशल मीडियावर घाराचे फोटो पोस्ट करत पूजाने स्वतःच्य भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिच्या घराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 5
पूजा ददलानी गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान याच्या सोबत काम करत आहे. पूजा शाहरुख याच्या ब्रँड एंडोर्समेंट पासून ते क्रिकेट टीमपर्यंत सर्व कामांची जबाबदारी घेते. पूजाच्या मानधनाबाबत सांगायचं झालं तर, पूजाच्या कमाईचा आकडा फार मोठा आहे. रिपोर्टनुसार शाहरुख पूजाला वर्षाला जवळपास २० कोटी रुपये मानधन देतो.