Shah Rukh Khan | ‘माझा बॉयफ्रेंड वाट बघतोय’ म्हणत गौरीने शाहरुखला नाकारलं, आज लग्नाचा 30वा वाढदिवस
बॉलिवूडचा बादशाहा (Shah Rukh Khan) अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांचा आज लग्नाचा वाढदिवस. गेली 30 वर्ष ते एकमेकांची साथ देत आहेत.
1 / 7
बॉलिवूडचा बादशाहा (Shah Rukh Khan) अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांचा आज लग्नाचा वाढदिवस. गेली 30 वर्ष ते एकमेकांची साथ देत आहेत. गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. गौरी खान एक चित्रपट निर्माती आणि डिझायनर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींच्या घरापासून ऑफिसपर्यंतची रचना केली आहे. इंटिरिअर डिझायनर गौरी खानने तिच्या स्वतःच्या घरापासून ते शाहरुख खानच्या ऑफिसपर्यंत सर्वकाही डिझाईन केले आहे. तिच्या क्लायंट लिस्टमध्ये मुकेश अंबानीपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. मुंबईत त्याचे आलिशान घर आहे.
2 / 7
गौरी आणि शाहरुख खानचे लव्ह मॅरेज होते. शाहरुख खानसोबत तिची पहिली भेट 1984 साली झाली. त्यावेळी शाहरुख खान इतका मोठा कलाकार नव्हता आणि त्याचा संघर्षा सुरु होता. शाहरुख आणि गौरी यांनी सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
3 / 7
गौरीने आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले आहे. तिने लेडी श्री राम कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर गौरीने 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुख खानशी लग्न केले. त्यांना- आर्यन खान, अबराम खान आणि मुलगी सुहाना खान अशी तीन मुले आहेत.
4 / 7
गौरी आणि शाहरुखची प्रेमकहाणी इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम उदाहरण आहे. पहिल्या भेटीत जेव्हा शाहरुखला गौरीशी बोलायचे होते, तेव्हा तिने आपला प्रियकर बाहेर वाट पाहत असल्याचे सांगून त्याला नकार दिला होता. खरतर, त्यावेळी गौरीचा भाऊ बाहेर वाट पाहत होता. शाहरुखला जेव्हा कळले की, गौरी त्याच्याशी खोटे बोलते, तेव्हा त्याने गौरीला आपली बहीण मानण्याचा विनोद केला होता.
5 / 7
शाहरुख आणि गौरी पहिल्यांदा एका पार्टीमध्ये भेटले. जिथे गौरीला पाहिल्यानंतर शाहरुख तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी शाहरुख खान 19 वर्षांचा होता आणि गौरी फक्त 14 वर्षांची होती. शाहरुखला पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम जडले. त्याला तिच्याशी बोलायचे होते, पण गौरीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला.
6 / 7
आज शाहरुख आणि गौरी खानच्या लग्नाचा 30 वाढदिवस आहे. मात्र यादिवशी देखील आर्यन खान तुरुंगात असल्यानं त्यांच्या सेलिब्रेशनवर मर्यादा आल्या आहेत. यापूर्वी गौरी खानच्या जन्मदिनाला देखील तो उपस्थित नव्हता.
7 / 7
दोन आठवड्यांपूर्वी गौरी खान आर्यनला भेटायला जेलमध्ये गेली होती. सध्या आर्यन मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये आहे.