Photo : चिखलाने माखलेल्या शहनाज गिलचं खास फोटोशूट, पुन्हा व्हायरल झाली पंजाबची कॅटरिना
बिग बॉस 13 चा विजयी ठरला तो सिद्धार्थ शुक्ला. मात्र, त्या सिझनमध्ये आणि पुढेही नाव घेतलं जातं ते शहनाज गिलचं. या सिझनपासून ती पंजाबची कॅटरिना कैफ म्हणूनही ओळखली जाऊ लागली. शहनाज गिलने आपली सुंदरता आणि मस्तीखोर स्वभावानं करोडो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलंय.
1 / 5
बिग बॉस 13 चा विजयी ठरला तो सिद्धार्थ शुक्ला. मात्र, त्या सिझनमध्ये आणि पुढेही नाव घेतलं जातं ते शहनाज गिलचं. या सिझनपासून ती पंजाबची कॅटरिना कैफ म्हणूनही ओळखली जाऊ लागली. शहनाज गिलने आपली सुंदरता आणि मस्तीखोर स्वभावानं करोडो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलंय. शहनाजने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
2 / 5
शहनाजची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आसुसलेले असतात. आपल्या प्रत्येक पोस्टने ती आपल्या फॅन्सना भुलवत असते. तसंच ती आपल्या नव्या नव्या पोस्टद्वारे चाहत्यांना हैराणही करुन सोडते. त्याचा अंदाज तुम्हाला तिच्या नव्या पोस्टमधून येईल.
3 / 5
आपल्या ऑफिशियल इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शहनाजने काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती चिखलाने माखलेल्या अवस्थेत पाहायला मिळतेय. ब्लॅक शॉर्ट्स आणि टीशर्टमध्ये शहनाजचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना नव्याने घायाळ करतोय.
4 / 5
शहनाज सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी आपला नवा आणि ग्लॅमरस लूक शेअर करत असते. तिच्या नव्या पोस्टवर तिचे लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
5 / 5
एका फोटोमध्ये शहनाज आपल्या कपाळावर मातीचा गंध लावताना दिसतेय. तिचा मस्तीखोर अंदाजच तिची यूएसपी आहे. तिच्या चाहत्यांना तिचं हेच रुप भावतं. सध्या शहनाज सलमान खानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर पहिलं पाऊल ठेवतेय.