अजय देवगणचा ‘शैतान’ सुसाट, पहिल्याच दिवशी मोडला ‘तान्हाजी’चा रेकॉर्ड

| Updated on: Mar 09, 2024 | 4:41 PM

अजय देवगण, आर. माधवन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाची मुख्य भूमिका असलेला 'शैतान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 'शैतान'ने अजयच्या 'तान्हाजी'च्या कमाईचा विक्रम मोडला आहे.

1 / 5
अजय देवगण आणि आर. माधवन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘शैतान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.  इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या सुपरनॅचरल हॉरर चित्रपटाने ओपनिंग डे ला 15 कोटी 21 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

2 / 5
या चित्रपटाच्या नाइट शोजमध्ये सर्वात जास्त ऑक्यूपेंसी (43.02%) होती. तर एकूण ऑक्यूपेंसी 25.70% होती. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी एडवान्स बुकिंगच्या माध्यमातून 1 लाख 95 हजार तिकीटं विकून 4 कोटी 90 लाख रुपयांची कमाई झाली आहे.

3 / 5
अजयच्या करिअरमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा चित्रपट आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ या यादीत टॉपवर आहे. या चित्रपटाने ओपनिंग डे ला 32.09 कोटी रुपयांची कमाई केली होती.

4 / 5
विकास बहलने ‘शैतान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. यात दक्षिणेची अभिनेत्री ज्योतिकाची महत्त्वाची भूमिका आहे. गुजराती अभिनेत्री जानकी बोडीवालाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

5 / 5
दुसऱ्या बाजूला आमिर खानच्या बॅनरखाली बनलेल्या 'लापता लेडीज' चित्रपटाने 8 दिवसात 10 कोटींचा आकडासुद्धा पार केलेला नाही. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 60 लाख रुपयांचा बिजनेस केला. भारतात या चित्रपटाने 6 कोटी 80 लाख रुपयाची कमाई केलीय.