Marathi News Photo gallery Shaka Laka Boom Boom star Kinshuk Vaidya aka sanju transformation here is how dashing he looks now
‘शका लाका बूम बूम’मधील ‘संजू’ आठवतोय? आता त्याला ओळखणंही कठीण
आपल्या जादुई पेन्सिलने कोणतंही चित्र काढून 'शाका लाका बूम बूम' म्हटल्यावर ते सत्यात उरवणारा संजू आठवतोय का? लहानपणी ही अनेकांनी आवडली मालिका होती. या मालिकेत संजूची भूमिका साकारणार अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला आहे.
1 / 6
स्टार प्लस वाहिनीवर येणारी 'शका लाका बूम बूम' ही मालिका आठवतेय का? लहान मुलांमध्ये ही मालिका खूप लोकप्रिय होती. या मालिकेत संजूची भूमिका साकारलेल्या मुलाला खूप प्रसिद्धी मिळाली. संजू आणि त्याची जादुई पेन्सिल ही लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होती.
2 / 6
'शाका लाका बूम बूम'मध्ये किंशुक वैद्यने संजूची भूमिका साकारली होती. आता हाच संजू डॅशिंग हिरो बनला आहे. विविध म्युझिक व्हिडीओ, टीव्ही शोज आणि सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. किंशुकचा बदललेला लूक पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
3 / 6
किंशुकने वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'धांगड धिंगा' या मराठी चित्रपटातून त्याने अभिनयाला सुरुवात केली आणि त्यानंतर तो 'राजू चाचा' या बॉलिवूड चित्रपटात झळकला. मात्र 'शाका लाका बूम बूम' या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
4 / 6
'शाका लाका बूम बूम' या मालिकेनंतर किंशुकने अभिनयातून पूर्णपणे ब्रेक घेतला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतून त्याने टीव्हीवर पुनरागमन केलं. किंशुक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तो विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
5 / 6
किंशुकने काजोल, ऋषी कपूर, जॉनी लिव्हर आणि अजय देवगण यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला आहे. त्याचप्रमाणे 'शाका लाका बूम बूम' या मालिकेशिवाय त्याने 'वो है अलबेला', 'कर्ण संगिनी', 'जात ना पुछो प्या की', 'विष्णुपुराण', 'एक रिश्ता साझेदारी का' यांमध्येही काम केलंय.
6 / 6
सोशल मीडियावर किंशुकचे डान्स व्हिडीओसुद्धा व्हायरल होतात. त्याने बऱ्याच म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलंय. इन्स्टाग्रावर त्याचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.