संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिच्यानंतर आता शनाया देखील बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
विशेष म्हणजे थेट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या 'वृषभा' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पर्दापण करण्याची संधी ही शनाया कपूर हिला मिळालीये.
धर्मा प्राॅडक्शन्सच्या बेधडक चित्रपटात देखील शनाया कपूर ही मुख्य भूमिकेत असणार आहे. वृषभा चित्रपटातून डेब्यू करण्याची सुवर्णसंधी ही शनाया हिला मिळालीये.
जान्हवी कपूर हिने काही वर्षांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. खुशी कपूर देखील यंदा बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यांचीच चुलत बहीण शनाया देखील चित्रपटात धमाका करताना दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शनाया कपूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना शनाया कपूर ही दिसते.