शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’!
लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. शशांकची पत्नी प्रियांका दुसऱ्यांदा गरोदर आहे.
1 / 5
अभिनेता शशांक केतकरने 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका दुसऱ्यांदा गरोदर आहे. पत्नीसोबतचे खास फोटो पोस्ट करत शशांकने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली.
2 / 5
'2025 चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आणचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत', अशा शब्दांत शशांकने आनंद व्यक्त केला.
3 / 5
शशांकच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाविश्वातील मंडळींनी कमेंट्स करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तन्वी मुंडले, सुकन्या मोने, सलील कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर, तितिक्षा तावडे यांसारख्या कलाकारांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
4 / 5
शशांकने 4 डिसेंबर 2017 रोजी प्रियांका ढवळेशी लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रियांकाने मुलाला जन्म दिला. शशांक आणि प्रियांकाच्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. शशांक त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा ऋग्वेदचे फोटो पोस्ट करतो. मात्र यात त्याचा चेहरा अद्याप त्याने दाखवला नाही.
5 / 5
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला. यामध्ये तेजश्री प्रधानने त्याच्यासोबत काम केलं होतं. या दोघांची जोडी हिट ठरली होती. नंतर या दोघांनी लग्नसुद्धा केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. तेजश्रीला घटस्फोट दिल्यानंतर शशांकने प्रियांकाशी लग्न केलं.