बिग बॉस 13 फेम शहनाज गिलचे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे शहनाज गिलने पोस्ट केलेले लेटेस्ट फोटो. दरम्यान, शहनाज गिलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुन्हा एकदा नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
शहनाज गिलने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी शूट केले आहेत. डब्बू रतनानीच्या या फोटोशूटमध्ये शहनाज गिलने वेगवेगळ्या पोझमध्ये क्लिक केलेले फोटो पाहायला मिळाले आहेत.
या फोटोंमध्ये शहनाज गिलने अतिशय आकर्षक पोज दिल्याचे तुम्हाला दिसतंय. शहनाज गिलच्या चाहत्यांना या फोटोंवरून नजर हटवणं कठीण झालं आहे.
फोटोशूटमध्ये शहनाजने पांढऱ्या रंगाचा ऑर्गेन्झा रफल ड्रेस परिधान केला आहे. तिने तिचा मेकअप अगदी साधा ठेवला आहे आणि तिचे केस रफ लूक मध्ये आहेत. शहनाजचा एकूण लूक खूपच चांगला दिसत आहे.
या फोटोंमध्ये शहनाज गिलच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे. बिग बॉस 13 सिझन संपल्यानंतर शहनाजने तिच्या तब्येतीवर विशेष लक्ष दिलं. त्यानंतर ती जेव्हा जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा कायमच सर्वजण तिच्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल चर्चा होतच राहिली.