साधारण एक महीन्यापूर्वी आभिनेता सिध्दार्थ शुक्ला याचे निधन झाले. यावेळी त्याच्या नेहमी जवळ असणारी अभिनेत्री शहनाज गिल तुटून पडल्यासारखी दिसत होती. त्या काळात सर्व सोशल मीडियावर शहनाज गिलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. मात्र आता अभिनेत्री शहनाज गिल दु:खात न राहता पुन्हा कामावर रुजू होत आहे. 7 ऑक्टोबर रोजी ती पुन्हा कामावर रुजू होत असल्याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे 2020 साली निधन झाले. या काळामध्ये त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांना खूप साथ दिली. परंतू ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. मुलगी रिद्धीमा हिच्या मदतीने नीतू कपूर पुन्हा दमदार पर्दापण करणार आहेत, सध्या त्या 'जूग जूग जियो' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे संपूर्ण कलाविश्वाला धक्काच बसला त्याच्या निधनानंतर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती बरचं काळ धक्कामध्ये होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये ड्रग्ज हे नवीन प्रकरण सुरू झाले. यासर्वमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अनेक समस्यांना समोरे जावे लागले. परंतू स्व:ताला संभाळत तिने पुन्हा शूटिंगला जाणे सुरू केले आहे.
अभिनेत्री मंदीरा बेदीसाठी 2021 हे वर्ष अतिशय दु:खदायक होते. अभिनेत्री मंदीरा बेदीचे पती निर्माता राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन झालं. या गोष्टीमुळे मंदीरा बेदी अतिशय दु:खी होती. परंतू आता मंदीरा बेदी सोशल मीडियाच्या मध्यमातून पुन्हा कमबॅक करत आहे.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे 2020 मध्ये निधन झाले. त्याच्या जाण्याने संपुर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला. या सर्वात जास्त धक्का लागला तो अभिनेत्याचा मुलगा बाबील याला. परंतू बाबील आता धक्कातून सावरला आहे. तो लवकरच त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे अशी माहिती त्यांने सोशल मीडियावर दिली आहे.