‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बांधली लग्नगाठ; कोण आहे पत्नी?
'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'शिवा' या मालिकांमध्ये घराघरात पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकर याने गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
1 / 6
अभिनेता शाल्व किंजवडेकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून घराघरात पोहोचला. त्यानंतर तो आता झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाल्वने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
2 / 6
गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी त्याने लग्न केलंय. गेल्या काही वर्षांपासून शाल्व आणि श्रेया एकमेकांना डेट करत होते. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.
3 / 6
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शाल्व आणि श्रेयाच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
4 / 6
लग्नसोहळ्यात श्रेयाने लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने परिधान केले होते. तर शाल्वनेही लाल रंगाची शेरवानी घातली होती.
5 / 6
शाल्व आणि श्रेया गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. श्रेया ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.
6 / 6
श्रेया डफळापूरकर ही कॉस्च्युम डिझायनर आहे. 'स्टाईल बाय श्रेया' हा तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसाठी कॉस्च्युम डिझायन केला आहे.