Marathi News Photo gallery Shivani surve bang on comeback as her serial Thoda Tuza Ani Thoda Maza bags second position in trp list
शिवानी सुर्वेचं दमदार कमबॅक! TRP यादीत मालिकेची मोठी झेप
अभिनेत्री शिवानी सुर्वेनं मालिकाविश्वात दमदार पुनरागमन केलंय. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही तिची मालिका 17 जूनपासून सुरू झाली असून अल्पावधीतच त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.
1 / 5
'देवयानी' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेनं तब्बल नऊ वर्षांनंतर पुनरागमन केलंय. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून तिने दमदार कमबॅक केलंय. नुकतीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
2 / 5
मालिकांच्या टीआरपीची यादी समोर आली असून नेहमीप्रमाणे जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने बाजी मारली आहे. तर दुसऱ्या स्थानी शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका पोहोचली आहे. शिवानीच्या मालिकेने सुरुवातीलाच इतर मालिकांना दणका दिला आहे.
3 / 5
विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानातील या मालिकांच्या रेटिंगमध्ये फारसा फरक नाही. 'ठरलं तर मग'ला 6.9 रेटिंग मिळाली असून ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ला 6.8 इतकी रेटिंग मिळाली आहे. तिसऱ्या स्थानी 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका आहे.
4 / 5
'प्रेमाची गोष्ट' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिका चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत शिवानी ही मानसी सणसची व्यक्तिरेखा साकारत आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी तिच्या वडिलांच्या शब्दाबाहेर जात नाही.
5 / 5
17 जूनपासून शिवानीची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अवघ्या काही दिवसांतच त्याला लोकप्रियता मिळत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. शिवानीसोबत या मालिकेत अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे.