Marathi News Photo gallery Shivsena eknath shinde making fun of uddhav thackrey and sanjay raut with the help of vyangachitra cartoons
“कणा काढल्यामुळे वाकणे सोपे झाले” व्यंगचित्रांच्या माध्यमातून शिवसेना पुन्हा आक्रमक!
गिरीश गायकवाड प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 6 नोव्हेंबर 2023: विरोधकांचा समाचार घेणारी व्यंगचित्र शिवसेनेच्या वतीने प्रसारित. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांचे कधी चिमटे काढत असत तर कधी वाभाडे. मार्मिक मात्र तितकाच स्पष्ट संदेश देणाऱ्या या व्यंगचित्रांची परंपरा पुढे नेत शिवसेनेने विरोधकांवर हल्लाबोल सुरू केल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.