IPL मध्ये KKR फूस्स्स, पण श्रेयस अय्यर मालामाल, विकत घेतली मर्सिडीज SUV, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जातो. IPL 2022 नंतर श्रेयस अय्यरने आपल्या लग्जरी लाइफस्टाइलसाठी एक शानदार गाडी विकत घेतली आहे.
1 / 5
कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जातो. IPL 2022 नंतर श्रेयस अय्यरने आपल्या लग्जरी लाइफस्टाइलसाठी एक शानदार गाडी विकत घेतली आहे.
2 / 5
श्रेयस अय्यरने मर्सिडीज-एएमजी जी 634 मॅटिक SUV विकत घेतली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गाडीचे फोटो शेयर केलेले नाहीत. जर्मन कार मेकरच्या प्रमुख डीलरशिपने गाडीसोबत श्रेयस अय्यरचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला नव्या मर्सिडीज-बेंज जी 63 कारसाठी शुभेच्छा, असं लँडमार्क कार्स मुंबईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे. आमच्या स्टार कुटुंबात तुमचं स्वागत. तुमचा कव्हर ड्राइव्ह पाहताना आम्हाला जितका आनंद होतो, तितकाच आनंद तुम्हाला ही कार चालवताना होईल, अशी अपेक्षा आहे.
4 / 5
श्रेयस अय्यरच्या या नव्या गाडीची किंमत 2.45 कोटी रुपये आहे. स्पीड बद्दल बोलायचं झाल्यास ही SUV फक्त 4.5 सेकंदात ० ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. फरारी ही श्रेयस अय्यरची आवडती कार आहे. त्याच्याकडे ऑडी, S5, BMW सारख्या महागड्या कारस आहेत. श्रेयस आलिशान कारसचा शौकीन आहे.
5 / 5
श्रेयस अय्यरला यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये kkr ने 12 कोटींपेक्षा जास्त रक्कमेला विकत घेतलं होतं. पण केकेआरचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. तो कोहलीच्या क्रमांकावर म्हणजे तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल.