Lipstick Side Effects: लिपस्टीक लावल्याने होऊ शकतो ‘हा’ त्रास , असा करा बचाव

| Updated on: Oct 27, 2022 | 1:43 PM

एका अभ्यासानुसार, रंग बनवण्यासाठी लिपस्टीकमध्ये मँगनीज, लेड आणि कॅडमिअम यांचा वापर केला जातो.

1 / 5
छान, सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही ?  आपण चांगलं दिसावं अश प्रत्येक व्यक्तीचीच इच्छा असते. त्यासाठी बाजारात विविध प्रकारची प्रॉडक्टसही अथवा सौंदर्य प्रसाधनेही उपलब्ध असतात. त्यापैकीच एक प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टीक.  लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लिपस्टीक लावायला खूप आवडते. मात्र हीच लिपस्टीक आपल्या आरोग्यासाठी अतिशय (health) घातक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? ओठांचे सौंदर्य वाढवणाऱ्या या लिपस्टीकमध्ये अनेक केमिकल्स वापरली जातात, ज्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते.

2 / 5
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या एका अभ्यासानुसार,  रंग बनवण्यासाठी लिपस्टीकमध्ये मँगनीज, लेड आणि कॅडमिअम यांचा वापर  केला जातो. लिपस्टीकचा वापर केल्याने ॲलर्जीही होऊ शकते, असेही मानले जाते.

3 / 5
एका संशोधनानुसार, ओठांसाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात येतो. या रसायनांमध्ये लेडचाही समावेश असतो. ओठांवर लिपस्टीक लावल्यामुळे लेड तोंडाच्या माध्यमातून पोटात जाते.  ज्यामुळे पोटासंदर्भात समस्या उद्भवू शकतात.

4 / 5
याापासून बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम हर्बल लिपस्टीक वापरण्यास सुरूवात करावी. लिपस्टीक लावण्यापूर्वी ओठांवर एक बेस जरूर लावावा. त्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता.  हे लावल्याने ओठ आणि लिपस्टीक यांच्यादरम्यान एक थर तयार होतो, जो लिपस्टीकच्या दुष्परिणांमापासून ओठांचे संरक्षण करतो.

5 / 5
 लिपस्टीक तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लेडमुळे ती (लावणे) गरोदर बायकांसाठीही धोकादायक ठरू शकते. हे गरोदर महिला व तिचे बाळ या दोघांचेही नुकसान करू शकते. लिपस्टीक ही ओठांद्वारे पोटापर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे रक्तातील लेडची पातळी अथवा लेव्हल वाढू शकते.