Marathi News Photo gallery Sidhu moosewala mother denied surrogacy for second pregnancy father reveals who will take care of little son after they die
सिद्धू मूसेवालाच्या आईला सरोगसीने नको होतं दुसरं बाळ; वडील म्हणाले “माझ्या निधनानंतर त्याला..”
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी मार्च महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धूचे वडील बलकौर सिंग हे पत्नीच्या गरोदरपणाच्या निर्णयाबद्दल व्यक्त झाले.
1 / 5
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर त्याचे आईवडील खूप खचले होते. पंजाबमधील मनसा जिल्ह्यात सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर मूसेवालांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
2 / 5
सिद्धूची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयव्हीएफच्या मदतीने मुलाला जन्म दिला. या दुसऱ्या मुलाचंही नाव त्यांनी शुभदीप असंच ठेवलं आहे. सिद्धूचंही खरं नाव शुभदीप असं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मूसेवालाच्या वडिलांनी पत्नीच्या दुसऱ्या प्रेग्नंसीबाबत मौन सोडलं.
3 / 5
"मला याची जाणीव आहे की जेव्हा आमचा मुलगा शुभ मोठा होईल, तेव्हा कदाचित मी त्याच्यासोबत नसेन. मी माझ्या हृदयाचं स्वास्थ्य राखण्यासाठी रोज अनेक औषधं खातो. किमान जेव्हा माझे अखेरचे क्षण येतील, तेव्हा माझ्या बाजूने कोणी तरी उभं असेल", असं ते म्हणाले.
4 / 5
"भविष्यात चरण किंवा मला काही झालं तर मला विश्वास आहे की माझे कुटुंबीय शुभची काळजी घेतील. आम्ही सुरुवातीला सरोगसीचाही विचार केला होता. मात्र पत्नीने सरोगसीला नकार दिला होता. तिने स्वत: आई होण्याचा निर्णय घेतला होता", असंही त्यांनी सांगितलं.
5 / 5
"सिद्धूच्या निधनानंतर आम्ही पूर्णपणे खचलो होतो. हवेलीमध्ये आम्ही दोघं रडत बसायचो. त्यातच मला हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. माझी आणि माझ्या पत्नीची अशी अवस्था पाहून जवळच्या नातेवाईकांनी, कुटुंबीयांनी आम्हाला दुसऱ्या बाळाबद्दल विचार करण्याचा सल्ला दिला होता", असं बलकौर यांनी सांगितलं.